Monday, 11 November 2019

गायी/म्हशींवरील लाळखुरकत लसीकरण मोहिम सुरु


जळगाव, दि. 11 - जिल्ह्यामध्ये गायी/म्हशींसाठी केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत लाळखुरकत (एफ.एम.डी) लसीकरण मोहिम 29 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.
            सर्व पशुपालकांनी आपल्याकडील गायी/म्हशींना लाळखुरकत (एफ.एम.डी) लसीकरण करणेसाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधून आपल्या लाळखुरकत बाधीत गायी/म्हशींवर इलाज करून घ्यावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.                         
000

No comments:

Post a Comment