Friday, 15 November 2019

बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन



         जळगाव, दि. 15 :- बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
            याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविन्द्र भारदे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment