जळगाव,
दि. 1 - राज्यातील धार्मीक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ
महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभुत सुविधा
पुरविण्यासाठी अनुदान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सन 2019-2020 या आर्थिक
वर्षासाठी इच्छूक शाळांकडून अर्ज मागविण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे
परिपूर्ण प्रस्ताव सादर करावयाची मुदत 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत विहित करण्यात आली
होती.
तथापि,
काही शाळांना या शासन निर्णय वा परिपत्रकाची माहिती मिळू शकली नाही. तसेच
महाराष्ट्रात सार्वजनिक शासकीय सुट्या व पाऊस यामुळे प्रस्ताव वेळेत सादर करू शकले
नसल्याचे अनेक संस्थांनी दुरध्वनीद्वारे कळविले आहे. शासनाकडे संस्थांनी विनंती
केल्यानुसार या योजनेतंर्गत प्रस्ताव सादर करण्यास 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत
मुदतवाढ देण्यात आली आहे.
इच्छूक
शाळांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत. असे
आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment