जळगाव, दि. १६ - समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी पीडीत महिलांना व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या न्याय हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. याउद्देशाने महिलांच्या तक्रारी/ अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तीसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.
नोव्हेंबर-2019 च्या महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, दि. 18 नोव्हेंबर, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. तरी महिला लोकशाही दिनात आपल्या तक्रारी व गाऱ्हाणी मांडू इच्छित असणाऱ्या महिलांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव श्री. विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:
Post a Comment