Thursday, 7 November 2019

निवृत्तीवेतन धारकांनी हयातीच दाखला कोषागारात सादर करावा- जिल्हा कोषागार अधिकारी प्र.सि.पंडीत


       जळगाव दि.07:- जळगाव कोषागारतून निवृत्तीवेतन घेणाऱ्या राज्य शासनाचे निवृत्तीवेतन धारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारक तसेच राज्याचे महाराष्ट्र शासनामार्फत निवृत्तीवेतन घेणारे निवृत्तीवेतन धारकांनी 1 नोव्हेंबर पासून निवृत्तीवेतन धारकानी  हयातीचा दाखला कोषागारात सादर करणे आवश्यक आहे.
            निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला आपण ज्या बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेमध्ये कोषागाराने पाठविलेल्या हयातीच्य यादीमध्ये आपल्या नावासमोर दिनांकित करणे आवश्यक आहे.
            तरी राज्य शासनाच्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी ,जळगाव प्र.सि.पंडीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

No comments:

Post a Comment