जळगाव, दि. 8 - डॉ.
झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2019-2020 साठी ज्या मदरसांमध्ये पारंपारिक
धार्मिक शिक्षणासोबतच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू
या विषयांचे शिक्षण देण्यात येते. ज्यांना आधुनिक शिक्षणाकरीता पायाभूत सुविधा
निर्माण करण्यासाठी फक्त निवासी मदरसा अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या मदरसांकडून अर्ज मागविण्यास 24 ऑक्टोंबर च्या शासन
निर्णयानुसार 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मदरसा/मदरसे
चालविणाऱ्या संस्था धर्मदाय आयुक्त अथवा महाराष्ट राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत
असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अनुदान मिळवू इच्छित मदरसा चालकांनी विहित
नमुन्यातील आपले प्रस्ताव 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी
कार्यालय, जळगाव या कार्यालयात सादर करावेत. असे श्री. प्रतापराव पाटील, सदस्य
सचिव उच्चस्तरीय निवड समिती, तथा जिल्हा नियोजन अधिकारी, जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वे कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment