जळगाव दि. 21 :-
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी तसेच त्यांचे अवलंबित जे कुटुंब
निवृत्तीवेतन धारकांनी प्रत्येक वर्षी माहे नोव्हेंबरमध्ये आपले ह्यातीचे
प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक असते. तरी अजूनही ज्या पेन्शनधारकांनी चालु
वर्षीचे ह्यातीचे प्रमाणपत्र (Jeevan Pramaan Patra) बँकेला सादर केले नाहीत,
त्यांनी दि. 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंत न चुकता ऑन लाईन पद्धतीने सादर करावे,
त्यासाठी आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पीपीओ, रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक यांची
आवश्यकता असते. मात्र आधार लिंकींग फिंगर प्रिंटमध्ये अडचण येत असल्यास अशा पेन्शन
धारकांनी प्रत्येक्ष बँकेत जाऊन त्यांचे प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी 0257-2241414
या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
जळगाव यांनी एक प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment