Friday, 29 November 2019

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या डिसेंबर महिन्याच्या तालुकानिहाय दौरा कार्यक्रमात बदल


            जळगाव, दि. 29 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव या कार्यालयाने माहे डिसेंबर, 2019 च्या तालुका निहाय मासिक दौरा कार्यक्रमात बदल जाहिर केला आहे. बदल केल्यानुसार तालुकानिहाय वार (दिवस) अशा प्रकारे आहेत.
  1) अमळनेर- पहिला सोमवार व तिसरा मंगळवार, 2) जामनेर-दुसरा गुरुवार, 3) पाचोरा- पहिला बुधवार,              4) भुसावळ- पहिला गुरूवार व तिसरा गुरूवार, 5) धरणगाव- तिसरा गुरूवार, 6) चाळीसगाव-दुसरा व तिसरा सोमवार, 7) सावदा (ता.रावेर) - पहिला शुक्रवार, 8) चोपडा-दुसरा शुक्रवार, 9) रावेर-दुसरा मंगळवार, 10) बोदवड- पहिला शनिवार, 11) भडगाव-तिसरा बुधवार, 12) पारोळा-दुसरा बुधवार, 13) मुक्ताईनगर- पहिला मंगळवार. अशाप्रकारे तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले असल्याने संबंधितांनी याची नोंद घ्यावी. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment