जळगाव, दि. 26 - भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयात आज भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करुन संविधान दिन
साजरा करण्यात आला. जिलहाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासमवेत उपस्थित सर्व
अधिकारी, कर्मचारी यांनी उद्देशिकेचे वाचन केले.
अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी
उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उप जिल्हाधिकारी
(पुनवर्सन) सौ. शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा
माहिती अधिकारी विलास बोडके, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व
कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment