Thursday, 14 November 2019

पंडित जवाहरलाल नेहरू यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन





         जळगाव, दि. 14 - भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत अभिवादन करण्यात आले.
     जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
     याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हानिवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी  (महसूल) रविन्द्र भारदे, उपजिल्हाधिकारी  (पुनर्वसन) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, तहसिलदार बाबासाहेब गाढवे,  शरद मंडलीक, माणिक आहेर, प्रशांत कुलकर्णी, नायब तहसिलदार विकास लाडवंजारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                                                              000

No comments:

Post a Comment