Friday, 8 November 2019

मागासवर्ग आयोगाचे सदस्य धुळे व जळगाव जिल्हा दौऱ्यावर


            जळगाव, दि. 8 - महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य कीर व ठेलारी समुहाचा अभ्यास तथा क्षेत्र पाहणी दौऱ्यासाठी धुळे आणि जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे. दिनांक 12 ते 15 नोव्हेंबर, 2019 दरम्यान  डॉ. सुवर्णा रावळ, डॉ.भुषण कर्डीले, डॉ. राजाभाऊ करपे, श्री. डी.डी.देशमुख यांचा या दौऱ्यात समावेश आहे.
मंगळवार, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी  पुणे येथून सकाळी 8.00 वाजता धुळे शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह, धुळे येथे आगमण व व मुक्काम. बुधवार, दिनांक 13 नोव्हेंबर रोजी नवीन नियोजन भवन, धुळे येथे सकाळी 11 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत ठेलारी जमाती संदर्भात जाहिर जनसुनावणी कार्यक्रम. सांयकाळी 6 वाजता धुळे येथून जळगावकडे प्रयाण, रात्री 8 वाजता जळगाव येथे आगमन व मुक्काम. गुरुवार, दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.00 वाजा कीर या जातीच्या क्षेत्र पाहणीसाठी भुसावळकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता शासकीय विश्रामगृह ,भुसावळ येथे आगमन. दुपारी 1 ते 5 वाजेदरम्यान भुसावळ येथे कीर जाती समुहाचे क्षेत्रपाहणी. सायंकाळी 5.00 वाजता भुसावळ येथून जळगावकडे प्रयाण. रात्री 8.00 वाजता शासकीय विश्रमागृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम. शुक्रवार, दिनांक 15 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगगृह, जळगाव येथून सकाळी 8.00 वाजता पुणेकडे प्रयाण.
                                                                   000

No comments:

Post a Comment