जळगाव, दि. 29 - नाशिकरोड मध्यवर्ती
कारागृहातील शिक्षाबंदी क्रं.बी.46238 कै.गोरख रामदास काकडे, वय-28 यांस कारागृह
वैद्यकीय अधिकारी यांचे सल्यानुसार संदर्भ सेवा रुग्णालय, शालीमार, नाशिक येथे 30
ऑगस्ट, 2019 रोजी दाखल केले होते. औषधोपचार चालू असताना बंदी क्रं.बी. 46238 कै.
गोरख रामदास काकडे हा मयत झाल्याचे कर्तव्यावर हजर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.
विजयसिंग ज्ञानोबा मुंढे यांनी 30 ऑगस्ट, 2019 रोजी सकाळी 9.10 वाजता घोषित केले.
फौजदारी
प्रक्रीया संहीता 1973 मधील कलम 176 (1) (2) (3) (4) अन्वये कै. गोरख रामदास काकडे
त्यांच्या मृत्युबाबतच्या दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी,
नाशिक यांनी उप विभागीय अधिकारी, मालेगाव यांना दिले आहेत.
तरी
कै.गोरख रामदास काकडे यांचे मयताबाबत शंका असल्यास 4 डिसेंबर, 2019 पर्यंत उप
विभागीय दंडाधिकारी मालेगाव, उपविभागीय कार्यालय, मालेगाव, एकात्मता चौक, कॉलेज
रोड, नवीन तहसिल कार्यालय, मालेगाव, जि, नाशिक यांना लेखी स्वरूपात खुलासा
कळविण्यात यावा. 4 डिसेंबर, 2019 पर्यंत खुलासा प्राप्त न झाल्यास पुढील उचित
कार्यवाही करणेत येईल, याची नोंद घ्यावी. असे उप विभागीय अधिकारी, मालेगाव जि.
नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment