जळगाव,
दि. 28 - गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव
विभागाच्या अधिपत्याखालील मध्यम प्रकल्पावरून कालवा प्रवाही , कालवा उपसा , जलाशय उपसा , तसेच
लाभक्षेत्रातील, अधिसूचित नदी ,नाले,ओढे यावरून पाण्याचा लाभ घेणाऱ्या सर्व
लाभधारकांसाठी सूचित करण्यात येते की, सदर प्रकल्पात सिंचनासाठी अंशत: पाणीसाठा
उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याचे पाण्याचे आरक्षण वगळून उर्वरित उपलब्ध
पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगाम 2019-2020 मध्ये 15 ऑक्टोंबर 2019 ते 28 फेब्रुवारी
2020 या मुदतीत उभी पिके तसेच विहरीवरून तसेच अन्य मार्गाने पाणी पुरवठ्याची
पर्यायी व्यवस्था असेल अशा लाभधारकांना हरभरा ,ज्वारी, हायब्रिड दुरी , कडवळ,
करडई,भाजीपाला व चारा पिके इत्यादि हंगामी पिंकांना एकआवर्तन किंवा पाण्याच्या
उपलब्धतेनुसार मर्यादित पाणीपुरवठा करण्याचे कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत
मान्यता प्राप्त होईल असे गृहीत धरून ठरविण्यात आलेले आहे.
तरी
संबंधित प्रकाल्पांतर्गत येणाऱ्या
सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी पिंकांचे नियोजन करून पाणी मागणी करावी. त्यासाठी
नमुना 7 , 7 अ, व 7ब, चे पाणीअर्जांवर मागणी करून पाणी अर्ज 30 नोव्हेंबर 2019
पर्यंत संबंधित पाटशाखेच्या कार्यालयतात कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अगर पोस्टाने पाठवावेत.
सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी अटी व शर्ती अशा आहेत.
लाभधारक शेतकरी यांनी 2018-2019 पर्यंतची संपूर्ण पाणीपट्टी थकबाकीसह भरणा
केलेली असावी,भरणा उडाफ्याचा नसावा, पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीच्या
मुखाजवळच्या क्षेत्रासच मंजूरी देण्यात येईल,उडाफ्याचे व चारीच्या अथवा
कालव्यांच्या पृष्ट भागातील क्षेत्रास मुजुरी देण्यात येणार नाही, प्रत्येक चारीवर
सलग क्षेत्रासह मंजूरी दिली जाईल, शेतचारी गवत काढलेली असावी, प्रत्यक्ष पास
मिळाल्या शिवाय मुजूरी मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणीअर्जाचा निर्णय संबंधित
पाटशाखेत/ग्रामपंचायत नोटीस बोर्डावर जाहीर केला जाईल, मंजूर क्षेत्रावर मंजूर
पिकासच पाणी घ्यावे लागेल, पाणीअर्ज सादर करतांना 7/12 चा उतारा अथवा खाते पुस्तीका
संबंधित पाटशाखेत दाखवावी लागेल, पाणी पुरवठा व्यवस्थित व सुरळीत होण्यासाठी
शेतचाऱ्या स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. शेतचाऱ्या स्वच्छ ठेवणे व त्यांची देखभाल करणे
ही शेतकऱ्यांची जबाबदारी आहे, पिण्याचे पाण्याचे आरक्षण अथवा काही अपरिहार्य
कारणास्तव मंजूर पिकास पाणीपुरवठा न करता आल्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्यास
पाटबंधारे जबाबदार राहणार नाही .याचीही सर्व संबंधित लाभधारक शेतकऱ्यांनी नोंद
घ्यावी असे उपकार्यकारी अभियंता,गिरणा
पाटबंधारे विभाग,जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment