Saturday, 16 November 2019

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास 31 डिसेंबर अंतिम मुदत

      जळगाव, दि. 16 - अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार या कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील नंदुरबार, धुळे व जळगाव या जिल्ह्यातील सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षाकरिता वैद्यकीय, अभियांत्रिकी व व्यावासायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमातीच्या (ST) राखीव जागेसाठी प्रवेश घेणाऱ्या किंवा प्रवेश घेण्यास इच्छूक असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्राच्या तपासणीकरिता प्रस्ताव सादर करावयाचे असतील, अशा विद्यार्थ्यानी 31 डिसेबर, 2019 पर्यंत सादर करावेत.
             ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी वैधता प्रमाणपत्रांसाठी प्रस्ताव  सादर केले असतील त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रस्ताव सादर करण्याची आवश्यकता नाही. विद्यार्थ्यांचे जमात प्रमाणपत्र वेळेवर तपासणी होवून त्यांचे प्रवेशाचे कार्यवाही विहित वेळेत पूर्ण व्हावी, त्यांचे शैक्षणिक नुकसान हावू नये, यासाठी समिती कार्यालामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आपले जमात प्रमाणपत्र तपासणीच्या प्रकरणासंदर्भात समिती कार्यालयातील प्रबंधक यांचेशी संपर्क साधून त्यांचेसाठी ठेवण्यात आलेल्या नोंदवहीत आवश्यक माहिती भरण्यात यावी. जेणेकरून प्रकरण वेळेत निकाली काढणे समितीस सोईचे होईल. असे उपसंचालक (सं) तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार श्री. दिनेश तिडके यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                       000

No comments:

Post a Comment