जळगाव दि.22:- लेखा व कोषागारे, नाशिक
विभाग, नाशिक यांच्यामार्फत सत्र.क्र. 99 हे 23 डिसेंबर, 2019 ते 27 फेब्रुवारी, 2020 या 50 (दिवस) कामाचे दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्र लेखा लिपीक
प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
शासकीय कामकाजाचे स्वरुप लक्षात घेऊन मोड्युल्स पद्धतीने
प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्याची शिफारस करताना
नवनियुक्त कर्मचाऱ्यांना पुर्ण प्रशिक्षणास पाठवावे. वित्त व लेखा विषयाशी निगडीत
कर्मचाऱ्यांची पुर्ण सत्रासाठी शिफारस करण्यात यावी. शिफारस करताना मागासवर्गीय
कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे. पुर्ण सत्रासाठी कर्मचाऱ्यांना पाठविणे शक्य
नसल्यास आवश्यतेुनसार मोड्युल्ससाठी कर्मचाऱ्यांची शिफारस करावी.
प्रशिक्षण सत्रासाठी इच्छुक कर्मचाऱ्यांचे आवेदन पत्र 12 डिसेंबर 2019
रोजी अगर त्यापुर्वी कार्यालयास पोहचेल अशा रितीने पाठवावे. प्रशिक्षणासाठी
येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नाशिक वास्तव्यात राहण्याची व्यवस्था स्वखर्चाने करावी
लागेल. उशिरा आलेल्या आवेदनपत्रांचा विचार केला जाणार नाही, धुळे, जळगांव, अहमदनगर, नंदुरबार जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपिक
वर्गीय कर्मचारी प्रशिक्षणासाठी पाठवावे,
असे आवाहन लेखा व कोषागारे,
नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक
(प्रशिक्षण) सु. प्र. अहिरराव यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment