Monday, 25 November 2019

2 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


      जळगाव, दि. 25 :- जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी  सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी  जिल्हास्तरीय  लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे डिसेंबर  महिन्यातील पहिल्या सोमवारी, 2 डिसेंबर, 2019 रोजी  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
            जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून आपले तक्रारी अर्ज सोमवार, दिनांक 2 डिसेंबर, 2019 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे आयोजित लोकशाही दिनात सादर करावेत. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 
000

No comments:

Post a Comment