जळगाव.दि.13, जळगाव जनता सहकारी
बँक व महिला आर्थिक विकास महामंडळ तर्फे प्रायोजित कार्यक्रमात सदर इ-शक्ति
प्रोजेक्ट चे उद्घाटन छत्रपती संभाजी राजे नाट्यसंकुल,जळगाव येथे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाशजी ढाकणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथि जळगाव जनता
सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री अनिल राव, एल.डी.एम.श्री
अरुण प्रकाश यांची उपस्थिती होती.तसेच डी.आर.डी.ए.चे डॉ.प्रभाकर शिरसाठ उपस्थित
होते. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी डिजीटायझेशन ही काळाची गरज
असल्याचे नमूद केले. बचत गटांचे उपस्थित महिला सदस्यांना मार्गदर्शन
करताना नमूद केले की देशात 12 कोटी महिला असून बचत गटांची संख्या केवळ 1 कोटी आहे
ही संख्या वाढणे गरजेचे आहे पूर्वी महिला या फक्त काही ठराविक क्षेत्रात काम करीत
होत्या जसे नर्सिंग,बँक परंतु आता अशी परिस्थिति नाही
महिला या सर्व क्षेत्रात काम करीत आहेत.आज घरी बनवलेल्या वस्तु मिळणे दुर्मिळ झाले
आहे.अशा वस्तु जर महिलांनी बनवून विकल्या तर त्यांना त्यात वाव आहे फक्त याचे
मार्केटिंग योग्य पद्धतीने झाले पाहिजे.ज्या महिलाना शक्य असेल त्यांनी प्रक्रिया
उद्योग,डेअरी,फार्मिंग तसेच कागदी पिशव्या
बनवणे यासारखे देखील काम करण्यास हरकत नाही.ई शक्ति
प्रोजेक्ट मुळे महिला बचत गटांचे सेक्टर नुसार वर्गीकरण करणे शक्य
होईल.
प्रारंभी
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेचे ( नाबार्ड ) डी.डी.एम.श्री श्रीकांत झांबरे यांनी महिला बचत गटांच्या ई-शक्ति प्रोजेक्ट सुरू
करण्यामागील उद्देश विषद केला.ई-शक्ति प्रोजेक्ट मुळे महिला बचत गटांची
संपूर्ण माहितीचे डिजीटायझेशन होण्यास सुरुवात होणार असून त्यामुळे आज अशी स्थिति
आहे की बँका महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य करीत असून देखील केवळ 25% ते 30% गट
याचा लाभ घेत आहेत.परंतु आता सदर माहिती डिजीटलइज झाल्यामुळे बचत गटांचे ग्रेडिंग
होण्यास देखील मदत होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि जळगाव जनता
सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री अनिल राव यांनी आपल्या मनोगतात उपस्थित महिलांना
मार्गदर्शन करताना महिलांच्या अंगी चिकाटी असली पाहिजे जर चिकाटी व कुठलेही काम
करण्याची इच्छा असेल तर अशक्य असे काहींही नाही.जर घरातील महिला सक्षम व सुशिक्षित
झाली तर ती संपूर्ण कुटुंबाला पुढे नेऊ शकते त्यामुळे माहिलांनी सक्षम होणे आवश्यक
आहे यासाठी जळगाव जनता सहकारी बँक महिला बचत गटांना सर्वतोपरी मदत करण्यास सदैव
तयार आहे.एल.डी.एम.श्री अरुण प्रकाश यांनी महिलांना मार्गदर्शन करताना नमूद केले
की ई शक्ति प्रोजेक्ट मुळे महिला बचत गट सदस्य आपली माहिती घरी बसून बघू शकतात
तसेच या प्रोजेक्ट मुळे विविध बचत गटांची माहिती एकत्रित मिळू शकते तसेच यामुळे
बचत गटांना देण्यात येणार्या आर्थिक सहाय्यात देखील पारदर्शकता येण्यास मदत होईल
त्यामुळे
सदर प्रोजेक्ट सुरू करून राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक ( नाबार्ड ) ने ई
शक्ति प्रोजेक्ट च्या माध्यमाने महिला बचत गटांच्या डिजीटलायझेशन च्या दृष्टीने एक
महत्वाचे पाऊल उचलले आहे.सदर कार्यक्रमात इ-शक्ति प्रोजेक्ट चे
प्रेझेंटेशन व प्रास्ताविक राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँकेचे ( नाबार्ड )
डी.डी.एम.श्री श्रीकांत झांबरे यांनी केले तसेच
इ-शक्ति प्रोजेक्ट मधील डेटा कलेक्शन विषयीची माहिती
महिला आर्थिक विकास महामंडळ चे जिल्हा समन्वयक श्री शतिक शेख व जळगाव जनता
सहकारी बँकेच्या महिला बचत विभाग प्रमुख श्रीमती वैशाली महाजन यांनी विषद केली.
******
No comments:
Post a Comment