Friday, 29 November 2019

इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळातर्फे थकित कर्ज लाभार्थ्यांसाठी एक रकमी परतावा योजना


             जळगाव, दि.29 - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंळामार्फत इतर मागास प्रवर्गातील बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज पुरवठा केला जातो. महामंडळाच्या विविध कर्ज योजनेतंर्गत लाभार्थ्यांना व्यवसायाकरीता कर्ज पुरवठा केला आहे. कर्ज घेतलेल्या बहुतांश कर्जदारांनी कर्जाची परतफेडीचा कालावधी संपल्यावर देखील कर्जाची परतफेड केलेली नाही.
            महामंडळाने रुपये 25 हजाराच्या थेट कर्ज योजनेचे लाभार्थी वगळून अशा थकित लाभार्थी कर्जदारांसाठी एक रकमी कर्ज परतावा योजना सुरू केली आहे. संपूर्ण कर्जाची रक्कम परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यास थकित व्याज रकमेवर दोन टक्के सुट देण्यात येणार आहे. तरी या योजनेचा जास्तीत-जास्त थकित कर्जदारांनी लाभ  घेवून आपले कर्ज खाते बंद करावे, व कर्जमुक्त व्हावे.  असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जळगाव यांनी  एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment