जळगाव, दि 25 - भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांची सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यात येणार आहे. यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी 19 ते 28 मार्च, 2019 या कालावधीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे दिनांक 13 मार्च, 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी PCTC ट्रेनिंगच्या गुगल प्लस पेजवरती किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या www.mahasaink.com या वेबसाईट वरील रिक्य्रुटमेंट टॅबला क्लीक करुन त्यामधील उपलब्ध चेकलिस्ट आणि महत्वाच्या तारखा यांचे अवलोकन करावे. त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच त्यामध्ये दिलेले सर्व परिशिष्ट डाऊनलोड करुन त्यांच्याही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन आणावेत.
केंद्रामध्ये एस.एस.बी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे. व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत.
कंम्बाईड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSE) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA- UPSE) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.
एनसीसी “ C” सर्टिफिकेट “A” किंवा “B” ग्रेड मध्ये पास झालेले असावेत. एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे, युनिव्हर्सिटी एंट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर असावे. किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी क्र. 0253-2451031 आणि 0253-2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment