Monday, 18 February 2019

महिला लोकशाही दिनी एकवीस तक्रार अर्ज प्राप्त



       जळगाव, दि. 18 - दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
      या लोकशाही दिनात एकवीस तक्रार अर्ज प्राप्त झाले. यामध्ये वीस अर्ज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संबंधित तर एक अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालयाशी संबंधित आहे.
        यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, वरीष्ठ पोलिस अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी, विधी सल्लागार, संरक्षण अधिकारी आदि उपस्थित होते.
        यावेळी अध्यक्षांनी महिला लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जांचा आढावा घेतला. तसेच प्रलंबित तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सुचना उपस्थितांना  दिल्यात. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment