जळगाव, दि.22 :- जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क थकबाकीदार यांनी, त्यांना
प्राप्त झालेल्या नोटीशीमध्ये नमूद असलेल्या, कमी भरलेल्या मुद्रांक शुल्क व
नोंदणी फीचा भरणा त्वरीत संबधित तालुकास्थित दुय्यम निबंधक कार्यालयाशी किंवा
मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव कार्यालयाशी समक्ष संपर्क साधून करावा. असे आवाहन
मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव
कार्यालयाने केलेल्या महसूल वसूली प्रमाणपत्र (R.R.C) तसेच मिळकतीवरील मुद्रांक
शुल्काचा बोजा यास प्रतिसाद न देणा-या व महसुलाचा शासकीय भरणा न करणा-या थकबाकीदार
यांची यादी वर्तमान पत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे. महसुलाचा भरणा न
करणा-या व नोटीस न स्विकारणा-या थकबाकीदार यांच्याबाबत एकतर्फी कठोर कार्यवाही
(जसे त्यांच्या मालमत्ता जप्ती बाबतची कार्यवाही) करण्यात येईल. व याची सर्वस्वी
जबाबदारी ही संबधीत थकबाकीदार यांचीच राहील. याची सर्व थकबाकीदार यांनी नोंद
घ्यावी. व या कार्यालयास सहकार्य करावे. असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव श्री. व्ही. एस. भालेराव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment