Tuesday, 12 February 2019

शिष्यवृत्ती योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ



     जळगाव, दि. 12 :- अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेंतर्गत लाभ देण्याकरीता महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-2019 शैक्षणिक वर्षापासून https://mahadbtmahait,gov,in महाडीबीटी पोर्टल विकसीत करण्यात आले आहे.  या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यास 28 फेब्रुवारी, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
            त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वीच अर्ज भरलेले असतील आणि महाविद्यालयांनी त्या अर्जांची तपासणी केली असेल अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर Voucher redeem करणेबाबत मेसेज आले असतील. अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीन मधुन Voucher redeem करणेबाबत तसेच त्रुटींच्या पुर्ततेसाठी परत पाठविलेले अर्ज विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी सुधारणा करुन पुन्हा पाठविणे आवश्यक आहे.
            याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी  सुचना वसतीगृहाच्या सुचना फलकावर लावाव्यात. अनुसूचित जमातीचा कोणीही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास संबंधित शाळा/महाविद्यालयांच्या प्राचार्य/मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment