Friday, 1 February 2019

माजी सैनिकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मेळाव्याचे आयोजन


         जळगाव, दि. 31 - जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, युध्द विधवा/माजी सैनिक विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांच्यासाठी मंगळवार, दिनांक 5 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 11.00 वाजता माजी सैनिक सभागृह, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ, जळगाव येथे ले. कमांडर मिनल मधु पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
            या मेळाव्यात विविध अडीअडचणी, कल्याणकारी योजना, पेन्शनबाबतचे प्रश्न व इतर बाबींवर मार्गदर्शन होणार आहे. मेळाव्यास येतांना संबंधितांनी आपले ओळखपत्र, डिस्चार्ज बुक, पीपीओ तसेच बँक पासबुक व इतर उपलब्ध कागदपत्रे सोबत घेऊन यावेत. तसेच सर्व माजी सैनिक, युध्द विधवा/ माजी सैनिक विधवा तथा अवलंबित यांनी या मेळाव्यास आवर्जुन उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.  
०००

No comments:

Post a Comment