Monday, 18 February 2019

सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. शेखर चरेगांवकर यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम



       जळगाव, दि.18- महाराष्ट्र राज्याचे सहकारी परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. शेखर चरेगावकर हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            मंगळवार दि.19 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह जळगावकडे रवाना. सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.15 वाजता जळगाव येथून धरणगावकडे रवाना. सकाळी 10.00 आगमन. उपनिबंधक कार्यालय व सहकार भारती आयोजित प्रशिक्षण वर्गास उपस्थिती. (स्थळ : विश्वकर्मा सोसायटी, जळगाव रोड, धरणगाव), सायंकाळी सोयीनुसार धरणगाव येथून जळगावकडे रवाना. सायंकाळी सोयीनुसार शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन व मुक्काम.
        बुधवार दि. 20 फेब्रुवारी, 2019 रोजी सकाळी 9.15 वाजता जळगाव येथून शेंदुर्णीकडे रवाना. सकाळी 10.15 वाजता जामनेर तालुका नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्था संघ आयोजित प्रशिक्षण वर्गास उपस्थिती. (स्थळ :- पारस जैन मंगल कार्यालय, शेंदुर्णी, ता. जामनेर), दुपारी सोयीनुसार शेंदुर्णी येथून सोलापूरकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment