जळगाव दि.16 :- प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी 1.55
मिनिटांनी भारतीय वायुसेनेच्या विमानाने जळगाव विमान तळावर आगमन झाले. त्यांच्या
समवेत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय
दळणवळणमंत्री नितीन गडकरी होते.
प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या आगमनाप्रसंगी जळगाव विमानतळावर
जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी स्वागत केले. यावेळी
जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, महापौर श्रीमती. सिमा भोळे, आमदार सुरेश
भोळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला पाटील, आमदार स्मिता वाघ, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन.पाटील, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष
गाडीलकर, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतीन उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे
वायुदलाच्या हेलिकॅप्टरने धुळे येथील विविध विकासांच्या भुमिपुजनासाठी प्रयाण
झाले.
00000
No comments:
Post a Comment