Saturday, 16 February 2019

भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेसचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ लिंकद्वारे शुभारंभ





            जळगाव दि.16 :-  भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेसचे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ लिंकद्वारे हिरवी झेंडी दाखवून धुळे येथून  शुभारंभ केला.
          भुसावळ रेल्वे स्थानकावर आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी अपर मंडळ रेल्वे प्रबंधक मनोज सिन्हा, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, वरिष्ठ  मंडळ यांत्रिक अभियंता लक्ष्मी  नारायण, वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता पी. के. भंज, मंडळ दूरसंचार आणि सिग्नल अभियंता विजय सैनी, प्रा.सुनील नेवे, अनिकेत पाटील यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
            भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस सुरू झाल्याने खान्देशातील जनतेत चैतन्य निर्माण झाले असून जनतेची या रेल्वेमुळे  मोठ्या प्रमाणावर सोय झाली आहे.
00000

No comments:

Post a Comment