जळगाव, दि. 4 (जिमाका) -
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी
कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या
अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या
तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. आज झालेल्या
लोकशाही दिनी एकूण 214 तक्रार अर्ज दाखल झाले. यामध्ये सहकार, जिल्हा परिषद, मनपा,
महसुल, कृषि, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, पोलीस यासह इतर विभागांच्या तक्रारींचा
समावेश आहे.
या लोकशाही दिनास निवासी
उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर,
जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) बी. ए. बोटे, चिटणीस
मंदार कुलकर्णी यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही
दिनाच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी लोकशाही दिनात प्राप्त
झालेल्या तक्रारींचा आढावा घेतला. लोकशाही दिनी प्राप्त तक्रारी सर्व संबंधित
विभागांकडे पाठविण्यात आल्यानंतर त्या तक्रार अर्जांवर संबंधित विभागाने तातडीने
कार्यवाही करावी. जेणेकरुन तक्रारदार पुन्हा लोकशाही दिनी तक्रार घेऊन येवू नये
याची दक्षता घ्यावी.
०००
No comments:
Post a Comment