जळगाव,
दि 22:- जिल्ह्यात सन 2019 मध्ये सण
उत्सवादरम्यान सकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक
वापरासाठी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यात खालील तारखांना सुट
जाहिर केली आहे.
दिनांक
19 फेब्रुवारी शासकीय शिवजयंती, 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे
महाराष्ट्र दिवस, 6 सप्टेंबर गणेशोत्सव पाचवा दिवस, 8 सप्टेंबर गणेशोत्सव सातवा
दिवस, 12 सप्टेंबर गणेशोत्सव शेवटचा दिवस, 6 ऑक्टोबर नवरात्रौत्सव अष्टमी, 7
ऑक्टोंबर नवमी, 27 ऑक्टोबर दिपावली, 10 नोव्हेंबर ईद-ए-मिलाद, 25 डिसेंबर ख्रिसमस,
31 डिसेंबर वर्षअखेर याखेरीज तीन दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.
तथापि,
मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद
बाबींचे तंतोतंत पालन करावे. व मा. न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही,
याची दक्षता घ्यावी. असे जिल्हाधिकारी, जळगाव यांनी म्हटले आहे.
००००००
No comments:
Post a Comment