Saturday, 2 February 2019

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन


       जळगाव, दि. २ :- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 4 फेब्रुवारी, २०१९ रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
            जनतेची गाऱ्हाणी तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्‍यात येते. त्यानुसार या महिन्यात सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१९ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात. असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.                
000

No comments:

Post a Comment