जळगाव,
दि 22:- प्राणी क्लेष प्रतिबंधक
अधिनियम 1960 च्या कलम 4 अन्वये स्थापन केलेल्या भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या
संमतीने राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी
(एस.पी.सी.ए) स्थापित करण्यात आलेल्या आहेत. स्थापित केलेल्या सोसायट्यांवर
अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीस शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
त्यानुसार
जिल्ह्यात स्थापन झालेल्या सोसायटीची भारतीय जीवजंतू कल्याण मंडळाकडे नोंदणी
साठीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आहेत. तरी सोसायटी नोंदणीबाबतचे प्रस्ताव
बोर्डास सादर करण्यासाठी या सोसायटीची नोंदणी संस्था नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत जिल्ह्यातील
सहाय्यक संस्था निबंधक व सहाय्यक आयुक्त यांचेकडे करणे आवश्यक असल्याचे
जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment