जळगाव,
दि. 6 - मा. राष्ट्रीय हरीत लवाद, (न्यायालय) नवी दिल्ली यांनी मागुर या माशांच्या
प्रजनन, मत्स्यपालन, विक्री, वाहतुक करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे या
प्रतिबंधीत मागुर माशाचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे आदेश मा.
हरीत लवादाने सर्व राज्यांना दिलेले असून ते लागु झालेले आहेत.
त्यानुसार
जिल्ह्यातील सर्व मत्स्य कास्तकारांना, मासे विक्रेते, मत्स्यबीज निर्माते, मासळी
विक्रेते ठेकेदार, मत्स्यव्यवसायाशी संबधीत मत्स्यव्यावसायीक, मच्छिमार बांधव
यांना याव्दारे कळविण्यात येते की, मा. न्यायालयाच्या याचिका क्र. 381/2018 च्या
निकालाचे अवलोकन करावे. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रतिबंधीत मागुर माशाचे
संवर्धन व संगोपन, प्रजनन व विक्री करण्यात येऊ नये.
थाई
मागुर Extic Mangur (Clarias gariepinus) हा मासा भारतीय माशांच्या तुलनेत अधिक
मौंस भक्षक असल्याने पर्यावरणांचा समतोल बिघडविण्यासाठी कारणीभुत ठरत आहेत. तसेच
मत्ससंवर्धनास मागुर मासा हानीकरक आहे. या मासळीपासुन भारतीय प्रजातींना धोका
निर्माण होत असुन सदर जातीच्या माशांचे प्रजनन, संवर्धन, विक्री व वाहतुकीवर बंदी
घातली आहे. तरी मासळी विक्री व संवर्धन बंदीचे मत्स्य व्यवसायीक व्यापारी,
संवर्धक, प्रजनन करणारे कास्तकार या व्यवसायाशी संबधीत लोकांनी तंतोतंत पालन करावे.
अन्यथा मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. असे श्री.
र. ज. धडील, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, जळगाव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment