Saturday, 16 February 2019

पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांचा जिल्हा दौरा



        जळगाव, दि. 16 :- राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
          सोमवार दिनांक 18 फेब्रुवारी, 2019 रोजी दुपारी 12.08 वाजता गोवा एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून वाहनाने हिंगणे ता. जामनेरकडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता हिंगणे ता. जामनेर येथे आगमन व हिंगणे येथील गाळपेर क्षेत्रातील चारा लागवड पाहणी. दुपारी 3.00 वाजता पाळधी ता. जामनेर येथे आगमन व तात्पुरती पुरक पाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोताचे पाहणी. दुपारी 3.20 वाजता पाळधी येथून वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता जळगाव येथे आगमन व शिवाजी नगर रेल्वे उड्डान पुलाचे जोड रस्त्याचे बांधकामाचे भुमीपूजनास उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वाजता पाणी टंचाई आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ :- जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सायं 5.15 वाजता जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. (स्थळ :- जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सायं 7.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, आगमन व राखीव. रात्री 10.45 वाजता वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 11.13 वाजता जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment