जळगाव, दि. 5 - जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, युध्द विधवा/
माजी सैनिक विधवा तसेच त्यांचे अवलंबित यांच्या विविध प्रकारच्या अडी-अडचणी
सोडविण्यासाठी येथील माजी सैनिक सभागृहात माजी सैनिकांचा मेळावा संपन्न झाला.
या
मेळाव्यास ले. कमांडर मिनल मधु पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी
पेन्शन, कॅंटीन सुविधा व इतर विविध बाबींवर माजी सैनिकांना मार्गदर्शन केले. तसेच
माजी सैनिकांच्या विविध कल्याणकारी योजनांची विस्तारीत माहिती सुबेदार मेजर अनुरथ
भिवा वाकडे (नि.) कल्याण संघटक यांनी दिली. व सर्वांच्या अडी-अडचणी ऐकूण घेवून
त्याचे निराकरण केले. याप्रसंगी माजी कॅप्टन मोहन कुलकर्णी यांनीही सर्व उपस्थित
माजी सैनिकांना संबोधित करुन आपली कामे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून
नियमाप्रमाणे व विहित वेळेत करुन घेण्याचे आवाहन केले.
यावेळी
कर्नल पी. आर. सिंग, श्री. बी. आर. काळे, श्री विलास इंगळे, श्री. राजेंद्र कत्ते,
श्री. शिवशंकर झाडोकर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी व माजी सैनिक,
युध्द विधवा/ माजी सैनिक विधवा तसेच त्यांचे अवलंबित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००
No comments:
Post a Comment