जळगाव,
दि. 11- जिल्ह्यातील अनुसूचित जाती व
नवबौध्द घटकांतील युवक -युवतींसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण 15 जून,
2019 पासून हनुमान व्यायामशाळा अमरावती येथे
प्रशिक्षणासाठी निवड करुन पाठविण्यात येणार आहे. याकरीता 13 जून, 2019 रोजी पोलीस
कवायत मैदान, नवीन बसस्थानकासमोर, जळगाव येथे सकाळी 10.00 ते दुपारी 1.00
वाजेपर्यंत निवड प्रकियेचे आयोजन करण्यात आले आहे.
या
प्रशिक्षणासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 दरम्यान असावे. उमेदवारांनी निवड प्रक्रीयेसाठी येताना जातीचा दाखला, 12 वी
उत्तीर्ण असल्याचे गुणपत्रक, रहिवासी दाखला, दोन पोसपोर्ट आकाराचे फोटो व शाळा सोडल्याचा दाखला या सर्व
कागदपत्रांच्या प्रती स्वस्वाक्षांकीत करून सोबत आणाव्यात. असे आवाहन योगेश पाअील,
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment