Tuesday, 4 June 2019

खाजगी भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गट स्थापन्यासाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावे


            जळगाव, दि. 4 - जिल्ह्यातील चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव व जळगाव या 4 तालुक्यात खाजगी भागिदारी तत्वावर सधन कुक्कुट विकास गटाची स्थापना करावयाची आहे. जिल्ह्यातील तालुकास्तरावरील संबंधित पंचायत समित्यांचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेमार्फत प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह  30 जून, 2019 पर्यंत जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांचेकडे सादर करावे.
            अधिक माहिती व अर्जाच्या विहित नमुन्यासाठी संबंधित पंचायत समित्यांचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार)  यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment