Saturday, 1 June 2019

फैजपूर महसूल उप विभागाकडून जप्त वाळूच्या लिलावाबाबत सूचना


          जळगाव दि.१ :- मौजे सावदा तालुका रावेर येथील आ.ग.हायस्कूल येथे अवैधरित्या अंदाजे ११ ब्रास व नगरपालिका हद्दीतील मॅरीज हॉल समोर ३६ ब्रास अवैध रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. सदर रेतीसाठ्यांबाबत अपर जिल्हाधिकारी यांच्या दिनांक ४ एप्रिल २०१९ च्या आदेशानुसार ४७ ब्रास जप्त अवैध रेती साठ्याची ज्या रेतीची एकूण किंमत १,८२,१७२/- आहे. तरी या ४७ ब्रास रेतीचा लिलाव दिनांक ११ जून २०१९ रोजी  आयोजित करण्यात आलेला आहे. ईच्छुकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन उप विभागीय अधिकारी, फैजपुर जि.जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000

No comments:

Post a Comment