जळगाव,
दि. १७ - जागतिक योग दिन म्हणून जगभर २१ जून हा दिवस साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने
यंदाच्या योगादिनाची तयारी आणि उपाययोजना या विषयची पूर्वतयारी आढावा बैठक आज
निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न
झाली.
याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी
सुनंदा पाटील, तहसिलदार वैशाली हिंगे, मंदार कुलकर्णी, योग प्रशिक्षक आदि उपस्थित
होते. याप्रसंगी बोलतांना निवासी उप जिल्हाधिकारी वामन कदम यांनी योगादिनाच्या
कार्यक्रमाचे स्थळाचे संबंधितांनी पाहणी करून त्या जागेची स्वच्छता, सुरक्षितता
तसेच वाहतूक नियंत्रण या बाबींकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना केल्यात.
000
No comments:
Post a Comment