Saturday, 1 June 2019

फैजपूर महसूल उप विभागीय कार्यालयात ११ जून रोजी खाणपट्टयांचे लिलाव


          जळगाव  दि.१:-  यावल तालुक्यातील मौजे अकलुद ता.यावल येथील गट नं. ६६/२ क्षेत्र ५.५३ ही जमीन गृप ग्रामपंचायत कासवे यांचेकडे निहीत करण्यात आलेली आहे. सदर क्षेत्रापैकी ४२५० चौरस मीटर एवढे क्षेत्र स्टोन क्रेशर या औद्योगिक प्रयोजनार्थ जाहिर लिलाव करून भाडेपटयांने द्यावयाची आहे. संबंधित जमीनीचे मुल्यांकन किंमत ६७० रूपये प्रति चौरस मिटर प्रमाणे २८,४७,५०० एवढी निश्चित करण्यात आलेली आहे.
       तरी दिनांक ११ जून २०१९ रोजी सकाळी ११.००वाजता फैजपूर महसूल उप विभागीय कार्यालयात पार पडणाऱ्या होणाऱ्या या खुल्यापद्धतीच्या खाणपट्टे जाहिर लिलावात  त्या व्यक्ती अथवा संस्थांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमीनीचे वितरण) नियम १९७१ मध्ये विहित केलेल्या अटींची पुर्तता करून सहभागी  होता येईल. असे उप विभागीय अधिकारी ,फैजपूर जि.जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment