जळगाव, दि. 4- गोवर्धन गोवंश सेवा
केंद्र या सुधारीत योजनेंर्गत जिल्ह्यातील पाचोरा, अमळनेर, एरंडोल, भुसावळ,
चाळीसगाव या तालुक्यातून गोवंश सेवा केंद्र या संस्थांकडून विहित नमुन्यातील पूर्ण
भरलेले अर्ज 25 जून, 2019 पर्यंत तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार)
पंचायत समिती यांचेकडे पाठवावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले
आहे.
संस्थांनी आपले प्रस्ताव पंचायत समिती पाचोरा, अमळनेर, एरंडोल, भुसावळ व चाळीसगाव
यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह पाठवावे. अधिक माहिती व अर्जाच्या विहित
नमुन्यासाठी संबंधित पंचायत समित्यांचे पशुधन विकास अधिकारी यांचेशी संपर्क
साधावा. असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment