जळगाव,
दि.12- सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व विशेष
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा
फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन
योजना तसेच राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचे शिष्यवृत्ती अर्ज
सादर करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल 11 जून, 2019 पासून कार्यान्वित झाले आहे. अशी
माहिती योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण
यांनी दिली आहे.
ज्या
विद्यार्थ्यांनी 2018-2019 या शैक्षणिक वर्षात महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज
भरलेले नव्हते. ज्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीपुर्ततेकरिता
विद्यार्थ्यांच्या लॉगीनला परत पाठविले होते व त्यांच्या लॉगीनला वरील प्रवर्गातील
विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित होते. त्या सर्व प्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांचे
अर्ज सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांच्या लॉगीनला ऑनलाईन सादर करण्याकरीता
महाडिबीटी पोर्टल 11 ते 30 जून 2019 दरम्यान कार्यान्वित झाले आहे. या विहित
मुदतीनंतर मुदतवाढ मिळणार नसल्याने कुठलाही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती
लाभापासून वंचित राहणार नाही. याची सर्व संबंधित प्राचार्यांनी नोंद घ्यावी. असे
श्री. पाटील, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग,जळगाव यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment