जळगाव, दि. 13 - कापूस तसेच केळी खरेदीसाठी सर्व संबधित वजनेमापे
उपयोगकर्त्यानी त्यांचेकडील वजनमापे नियमाप्रमाणे तपासून घ्यावेत. कापूस व केळी
खरेदीसाठी शक्यतो इलेक्ट्रॉनिक काट्याचा वापर करावा, वजनमापाचे तपासणीचे
प्रमाणपत्र व्यवसायाचे ठिकाणी ग्राहकांना दिसेल, अश्या दर्शनी भागावर लावावे अथवा
स्वत:जवळ ठेवावे. त्याचबरोबर कापूस व केळी
खरेदी करताना योग्य मापानेच खरेदी करावी. असे आवाहन श्री. रा. भ. बांगर, सहायक
नियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग, जळगाव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक बैठक दर
महिन्याला आयोजित करण्यात येते. या बैठकीमध्ये ग्राहकांचे प्रश्न व अडचणीचे निवारण
केले जाते. या बैठकीत अशासकीय सदस्यांनी याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता याबाबत
विभागामार्फत वारंवार तपासणी करण्यात येते.
वजनमापे बाबत काही अडचणी/शंका असल्यास किंवा
तक्रारी असल्यास दूरध्वनी क्र 2241149 वर अथवा aclmjalgaon@yahoo.in या
इमेलवर व http://www.vaidhmapan.maharashtra.gov.in:443/ या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन श्री. बांगर यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment