जळगाव दि.18 :- शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा
संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन, उच्च शिक्षण विभाग,
नेहरू युवा केंद्र एन.सी.सी ,ए.एस.एस, स्काऊट
गाईड, पगारिया आयुर्वेद-पतंजली मेगा स्टोअर, इंडिअन रेडक्रॉस सोसायटी, भारत
स्वाभिमान, जी.एम.फाऊंडेशन, पतंजली योग समिती, विश्वमंगल नॅचरोपॅथी व्होकेशनल
ट्रेनिंग सेंटर, जळगाव, जिल्हा हौशी योगा असोसिएशन, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने
दिनांक 21 जून 2019 रोजी सकाळी 7.30 वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज, जिल्हा
क्रीडा संकूल, जळगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या
कार्यक्रमास जळगाव शहरातील जवळपास 5 ते 6
हजार शालेय विद्यार्थी / शहरातील नागरिक सहभाग घेणार आहेत.
योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा
संकुलात योग प्रात्यक्षिक करीता येणाऱ्या शालेय विद्यार्थी /नागरिकांचे पगारिया
डेंटल केअर, ए विंग जिल्हा क्रीडा संकूल जळगाव यांच्या मार्फत विनामुल्य
दंतचिकित्सा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत-जास्त विद्यार्थी तसेच
नागरिकांनी योग दिन कार्यक्रमास उपस्थित
राहून मोफत दंत चिकित्सकेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
******
No comments:
Post a Comment