जळगाव
दि. १ :- महाराष्ट्र शासनाच्या
सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणारे डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, माजी सैनिक कॉलनी भुसावळ, जि. जळगाव
या वसतीगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या इ. ८ वी ते महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना वसतीगृहात सन २०१९ -१९२० या शैक्षणिक वर्षासाठी
रिक्त झालेल्या जागांवर नव्याने प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनकडून
रिक्त असलेल्या जागेनुसार वसतिगृह प्रवेशासाठी ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
सदर अर्ज वाटप विनामुल्य असून गरजु विदयार्थ्यांनी
वरील पत्त्यावर कार्यालयाशी संपर्क साधावा
वसतिगृह प्रवेश हे त्या- त्या प्रवर्गातील रिक्त जागांवर गुणवत्ते नुसार दिली
जाईल.
वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना
शासनामार्फत निवास, भोजन, शैक्षणिक लेखन साहित्य अभ्यासक्रमित पुस्तके दिले जातात.
पदवी/पदविका अभ्यासक्रमित विदयार्थ्यांना रु. ४०००/- व रेणकोट / बुट इत्यादिंसाठी रु.
५००/- व प्रतिवर्षा करीता दोन शालेय गणवेशासाठी रु. १०००/- ड्रेसकोड गणवेश खर्च
रु. २०००/- रक्कम तसेच दरमहा निर्वाह भत्ता रु. ५००/- विदयार्थीनींच्या बँक
खात्यावर जमा करण्यात येतात.
संवर्गनिहाय
रिक्त जागांचा तपशिल ( विद्यालय विभाग) :- अनु. जाती -०३, अनु. जमाती -०१, वि. जा. भं. ज -००, इमाव – ००,
विमाप्र- ००, अपंग – ०१, अनाथ- ००, खासबाब-
०१, एकूण – ६.
संवर्गनिहाय
रिक्त जागांचा तपशिल (महाविदयालय विभाग)
:- अनु. जाती -१३, अनु. जमाती
-००, वि. जा. भ.ज - ०१, इमाव -००,
विमाप्र- ०१ , अपंग – ०१, अनाथ- ००, खासबाब- ०२, एकूण – १८ असे असून संबंधितांनी
याचा लाभ घ्यावा असे आवाहन गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह,
भुसावळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment