Friday, 21 June 2019

गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी 30 जूनपर्यंत अर्ज करावेत


            जळगाव, दि. 21 - गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या सुधारीत योजनेंर्गत जिल्ह्यातील पाचोरा, अमळनेर, एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव या तालुक्यात गोवंश सेवा केंद्र योजना राबविण्यात येणार आहे.
            यासाठी संस्थांकडून विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज 30 जून, 2019 पर्यंत तालुकास्तरावरील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेमार्फत आवश्यक व परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी व अर्जाच्या विहित नमुन्यासाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेशी संपर्क साधावा. असे श्री. गायकवाड, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment