Thursday, 13 June 2019

सहकार राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठकीचे आयोजन


जळगाव, दिनांक 13 - जळगाव ग्रामीण मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवार 14 जुन, 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वामन कदम, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, 14 व्या वित्त आयोगातंर्गत बांधकाम, जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या बांधकामाचा आढावा घेण्यात येणार आहेत.
या बैठकीस संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहवे. असे निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
000

No comments:

Post a Comment