जळगाव, दि. 19 - महाराष्ट्र राज्य
मागासवर्ग आयोगाच्या 27 मे, 2019 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार लाडवंजारी, वळूजवाणी
आणि तलवार कानडे (कानडी) जातीचे सर्वेक्षण व क्षेत्रपाहणी करीता आयोगाचे सदस्य हे
26 जून, 2019 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
आयोगाच्या सदस्यांना महाराष्ट्र शासनाच्या
सचिव पदाचा दर्जा असून या दौऱ्यात डॉ. सर्जेराव निमसे, तज्ञ सदस्य, डॉ. भुषण कर्डिले,
सदस्य, डॉ. राजाभाऊ करपे, सदस्य, श्री. के. एस. आढे, संशोधन अधिकारी आणि श्री. एन.
व्ही. जोशी, कनिष्ठ लिपीक यांचा समावेश आहे.
आयोगाच्या सदस्यांचा दौरा पुढीलप्रमाणे
आहे. 25 जून रोजी सायंकाळी 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व
मुक्काम, 26 जून रोजी सकाळी 9.00 ते 11.00 वा. जळगाव शहरामध्ये लाडवंजारी जातीसमुहाच्या वस्तीला भेट व क्षेत्र पाहणी.
सकाळी 11.30 ते 2.00 वा. जळगाव शहरामध्ये वळूजवाणी ,वळूज, वळुंज,कुकारी, शेटेदलाल
या जाती समुहाच्या वस्तीला भेट, दुपारी 2.00 ते 3.00 राखीव, दुपारी 3.30 ते4.00
वा. जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, जळगाव यांचेसमवेत लाडवंजारी या
जातीच्या व्यक्तींना निर्गमित करण्यात येणारे जात वैधता प्रमाणपत्राबाबत चर्चा. 27
जून 2019 रोजी सकाळी 9.00 वाजता सोयीनुसार पुणेकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment