Friday, 14 June 2019

विमानतळ परिसरातील बिबट अखेर जेरबंद वनविभागाची कामगिरी


          जळगाव, दि. 14 - जळगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या जळगाव विमानतळ परिसरात गेल्या महिन्याभरापासून दोन बिबट्या वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार सुरु होता. या दोन बिबट्यांना आज पहाटे जेरबंद करण्यास वनविभागास यश आल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली. आहे.
          याबाबत विमान प्राधिकरण, जळगाव यांनी जळगाव वनविभागास विमान उतरण्यास व उड्डाण होण्यास तसेच प्रवाश्यांच्या सुरक्षिततेस धोका होण्याबाबत कळविले होते. त्यानुसार उपवनसंरक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव यांनी सातत्याने दोन बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकामी गेल्या महिन्या भरापासून त्यांच्या अधिनस्त क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह शोध मोहिम राबविली. यामध्ये ट्रॅप कॅमेरा, विमानतळ प्राधिकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व वनविभागाचे सीसीटीव्ही फुटेज यांचा वापर करण्यात आला. या परिस्थितीबाबत वरिष्ठांना वेळोवेळी अहवालही सादर करण्यात आला.
          या घटनेचे गांर्भीय लक्षात उपवनसंरक्षक, जळगाव यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीने दोन बिबट वन्यजीव प्राणी यांना सुरक्षित व कोणत्याही प्रकारची इजा न होता पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याबाबत परवानगी मिळाविली होती. वनविभागाकडून विमानतळ परिसरात संभावित जागेवर ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसविण्यात येवून जळगाव वनक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी यांनी अहोरात्र गस्त करुन बिबटाच्या हालचालीची नोंद घेवून त्याप्रमाणे दोन ठिकाणी पूर्वपरवानगीने पिंजरे बसविण्यात आले.  विमानतळाचा परिसर 750 एकर असल्याने  दिगंबर पगार, उपवनसंरक्षक,जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली एन. जी. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव यांनी वनपरिक्षेत्रातील क्षेत्रिय कर्मचारी यांच्या मदतीने सदरील दोन बिबट ट्रॅप कॅमेरे व सीसीटीव्ही फुटेज यांचा पुरेपुर उपयोग करुन त्याचप्रमाणे श्री. राजेश ठोंबरे, मानव वन्यजीव रक्षक व श्री. विवेक देसाई, वन्यजीव अभ्यासक यांची मदत घेवून 14 जुन, 2019 रोजी पहाटे 3.00 वाजता पिंजऱ्यांमध्ये दोन बिबट जेरबंद करण्यात सफलता प्राप्त झाली. श्री. संजय खाचणे, बैद्यकीय अधिकारी, जळगाव यांचेकडून सदरील दोन बिबट्यांची पुर्णपणे तपासणी करण्यात आली. त्यांनी दोन्ही बिबट सुदृढ असल्याचे सांगितले. व त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली दिसून आलेली नाही.
          या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी डी. डब्लू. पगार, उपवनसंरक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली एन. जी. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव, श्री. राजेश ठोंबरे, मानव वन्यजीव रक्षक, श्री. विवेक देसाई, वन्यजीव अभ्यासक, श्री. पी. जे. सोनवणे, वनपाल, जळगाव, सी. व्ही. पाटील, दिपक पाटील, उल्हास पाटील, जितेंद्र चिंचोले, अश्विनी ठाकरे, वैशाली साळी व डी. डी. पवार सर्व वनरक्षक जळगाव व वनमजुर, जळगाव वनक्षेत्र यांनी पकडणेकामी मेहनत घेतली.
000

No comments:

Post a Comment