जळगाव, दि. 18:- सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षात 10 वी, 12
पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रीकी इत्यादि अभ्यासक्रमांमध्ये मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील
विद्यार्थी/विद्यार्थीनींना सरासरी 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्यांना महामंडळाकडून जेष्ठता व
गुणक्रमांकानुसार उपलब्ध निधीच्या अधीन राहून अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर
करण्यात येते.
सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात
उत्तीर्ण झालेल्या 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यास
क्रमासाठी 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त जिल्ह्यातील
प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांस निधीच्या उपलब्धतेनुसार वितरण करण्यात येणार आहे.
यासाठी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ संबंधितांना मिळण्यासाठी 20 जून 2019 सकाळी 11 वाजेच्या आत संपूर्ण कागदपत्रानिशी जिल्हा
कार्यालयात संपर्क साधावा
अर्जासोबत मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला,
रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, पुढच्या वर्गात प्रवेश
घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकेटसह जिल्हा व्यवस्थापकांच्या नावे
शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक
0257-2263294 वर संपर्क साधवा. असे जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
000
No comments:
Post a Comment