जळगाव, दि. 10 - केंद्र शासनाच्या सांख्यिकी एवं कार्यक्रम कार्यान्वयन
मंत्रालय (MOSPI) कडून 7 वी आर्थिक जनगणना देशभर लवकरच राबविण्यात येणार आहे. सातवी
आर्थिक गणना कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ई-गव्हर्नस यांचेकडून राबविली जाणार आहे. अशी
माहिती प्रमोदराव पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जळगाव यांनी दिली आहे.
या
गणनेसाठी आवश्यक प्रगणक व पर्यवेक्षक यांची नेमणूक कॉमन सर्व्हिस सेंटर ई-गव्हर्नस
यांचेकडून करण्यात आली आहे. या धर्तीवर 9 जुन, 2019 रोजी अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी
कार्यालय, जळगाव येथे ग्रामीणस्तर प्रगणक (Village Level Enumerator) यांचेसाठी
जिल्हास्तरावरील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
या
प्रशिक्षणासाठी श्री. लोकेश श्रीवास्तव, कॉमन सर्व्हिस सेंटर, नाशिक विभाग, श्री. प्रमोदराव
पाटील, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, जळगांव, श्री. सी. एन. रत्नपारखी, अधिक्षक, एन. एस.
एस. ओ., जळगांव, श्री. पी. व्ही. पाटील, वरिष्ट संशोधन अधिकारी, एन. एस. एस.ओ.,
जळगांव, श्री. सुनिल पाटील, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र जळगांव, श्री.
अभिनंदन पाटील, जिल्हा व्यवस्थापक, कॉमन सर्व्हिस सेंटर, श्री.राहुल देवरे, जिल्हा
व्यवस्थापक, कॉमन सर्व्हिस सेंटर, श्री.उत्कर्ष वाणी, जिल्हा समन्वयक, कॉमन
सर्व्हिस सेंटर आदि उपस्थित होते.
सर्वप्रथम
श्री सरस्वतीचे पुजन करून दीपप्रज्वलनाद्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
श्री. लोकेश श्रीवास्तव यांनी 7 वी आर्थिक गणनेबाबत पुर्वपिठीका विषद केली. त्यानंतर
श्री.सुनिल पाटील, व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी मार्गदर्शन केले. श्री.
रत्नपारखी व श्री. पी. व्ही. पाटील यांनी 7 व्या आर्थिक गणनेतील संकल्पना,
व्याख्या, याबाबत पॉवर पाईंट प्रेसेंटेशनव्दारे विस्तृत प्रशिक्षण दिले. श्री.
उत्कर्ष वाणी, जिल्हा समन्वयक, कॉमन सर्व्हिस सेंटर, यांनी 7 व्या आर्थिक गणनेचे
मोबाइल ॲप वर प्रत्यक्ष काम कसे करावे याची माहिती दिली.
श्री.प्रमोद पाटील, जिल्हा
सांख्यिकी अधिकारी यांनी प्रथमस्तर पर्यवेक्षण व दुय्यमस्तर पर्यवेक्षण यांनी कसे करावे याबाबत प्रशिक्षण दिले. श्री. लोकेश
श्रीवास्तव यांनी सर्व ग्रामीणस्तर प्रगणक यांना येणाऱ्या अडचणी व शंका याबाबत
निराकरण करून प्रोत्साहनपर विवेचन केले. सरतेशेवटी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील
अन्वेषक श्री. हर्षद राऊत यांनी क्षेत्रकाम करतांना येणाऱ्या अडचणीं बाबत
मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील श्री. प्रमोद पाटील जिल्हा सांख्यिकी अधिकारी,
श्री. प्रमोद साठे, श्री. संजय पाटील, श्री. चेतन देशपांडे, श्री. प्रकाशसिंग
तोमर, श्रीमती राणी आहिरे, कु. स्मिता पाटील, श्री. सतिष शिंदे, श्री. हर्षद राऊत
यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. अभिनंदन पाटील, जिल्हा
व्यवस्थापक, कॉमन सर्व्हिस सेंटर यांनी केले व शेवटी श्री. श्रीवास्तव यांनी
सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.
000
No comments:
Post a Comment