जळगाव] दि. 14 - दिवाणी न्यायाधीश
(कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, बोदवड यांचे न्यायालयाचा आणि न्यायालयाच्या
नुतन इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती
तथा जळगाव जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती सुनील प्रभाकर देशमुख यांचे शुभहस्ते आणि जळगाव
जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंदा आनंदा सानप यांचे
अध्यक्षतेखाली रविवार, दिनांक 16 जून, 2019 रोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
तरी या कार्यक्रमास सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे. असे संतोष दादाराव
गरड, दिवाणी न्यायाधीश, (कनिष्ठ स्तर) व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, बोदवड आणि
ॲङ अर्जून तुळशीराम पाटील, अध्यक्ष, बोदवड तालुका वकील संघ यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment